Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

औद्योगिक क्रांतीमध्ये ‘जिनॉमिक्सचे महत्व- डॉ. शां. ब. मुजुमदार

औद्योगिक क्रांतीमध्ये ‘जिनॉमिक्सचे महत्व- डॉ. शां. ब. मुजुमदार

डॉ. गुप्ते आणि डॉ. भोंडवे लिखित ‘जिनॉमिक्स’ पुस्तकाचे प्रकाशन

marathinews24.com

पुणे – औद्योगिक क्रांतीमध्ये जिनॉमिक्सला अनन्यसाधारण महत्व राहणार असल्याचे मत सिंबायोसिसचे कुलपती पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले. पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगरोग, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते व इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे लिखित आणि रोहन प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘जिनॉमिक्स- मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस मधील विश्वभवन येथे संपन्न झाला, यावेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. रोहन प्रकाशन आणि अस्मिता फाउंडेशन यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता.

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना हिंदुत्व वादाचा सर्वोच्च बिंदू – संजय उपाध्ये – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची उपस्थिती होती. याबरोबरच पुस्तकाचे लेखक डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे, रोहन प्रकाशनाचे संचालक रोहन चंपानेरकर, डॉ. अस्मिता गुप्ते आदी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार म्हणाले, अलीकडच्या काळात जिनॉमिक्सचे महत्व वाढत चालले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. जिनॉमिक्स व मानव यांचा जवळचा संबध आहे. जिनॉमिक्सच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होणे आता शक्य झाले आहे. मानवाला भविष्यात होणारे आजार, त्यावर नवीन औषधोपचार याचे संशोधन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये जिनॉमिक्सला अनन्यसाधारण महत्व राहणार आहे. तर डॉ. रमण गंगाखेडकर यांनी विकसनशील भारत म्हणून देश पुढे जात असताना जिनॉमिक्स हा विषय प्रत्येकाला माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यकाळात या विषयाचे महत्व वाढेल यालाही दुजोरा दिला.

डॉ. संजय गुप्ते म्हणाले की, जिनॉमिक्स हे शास्त्र वेगाने प्रगती करत आहे. “माणूस आणि चिम्पान्झी यांच्यामधील ९९ टक्के जीन्स सारखे आहेत. मांजर आणि माणूस यांच्यामध्ये ९० टक्के, माशीमध्ये ६५ टक्के, केळ्यामध्ये ६० टक्के जीन्स हे माणसाशी जुळतात त्यामुळे प्राणिशास्त्र व वनस्पती शास्त्र यांचे जवळचे नाते आहे. कालांतराने आपल्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे हे जीन्सच्या माध्यमातून ठरवणे शक्य होणार आहे. नोकरी करताना, खेळाडू म्हणून करियर करताना या शास्त्राचा चांगला उपयोग होईल. आपण कुठला आहार घ्यावा ज्याने आपला खरा फायदा होईल, हे सुद्धा आपल्या जीन्स वर अवलंबून असते. तसेच आपण कुठला व्यायाम कुठल्या वेळेस केल्यास जास्त परिणामक होईल हे सुद्धा आता जेनेटिक टेस्ट करून ठरवता येते असेही डॉ. गुप्ते यांनी नमूद केले.

जिनॉमिक्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समजणे शक्य झाले असून हे शास्त्र एका फॅंटसीसारखे असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यावेळी म्हणाले. जिनॉमिक्सचा प्रसार भविष्यात वाढणार असल्याचे सांगताना या विषयावरील पुस्तक तयार करण्याची भूमिका रोहन चंपानेरकर यांनी यावेळी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×