Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

कुख्यात गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच

कुख्यात गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच

अनधिकृत बांधकामावर बुलडोजर; पुणे पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाणच्या मालमत्तेवर टाच येणार असून काळेपडळ पोलीसांनी केलेल्या घरझडतीमध्ये वेगवेगळ्या जागेचे कागदपत्रे, किंमती देखाव्याचे वस्तु, चैनिच्या वस्तु मिळुन आल्या आहेत. तसेच पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाणच्या सय्यदनगर परिसरातील अनाधिकृत कार्यालयाच्या बांधकामावर बुलडोजर फिरवला आहे.

चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या, अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी 

पुणे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील टोळ्यांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांचे आर्थिक पुरवठ्याचे मार्ग रोखण्यासह त्यांनी अवैधमार्गाने मिळवलेल्या बेहिशीबी संपत्तीवर टाच आणण्याची मोहिमही हाती घेतली आहे. त्यानुसार, हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण व त्याच्या टोळीतील इतर साथीदार यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. टिपू पठाण व त्याचे साथीदार यांनी अवैध मार्गाने लाखो रुपयांची मालमत्ता कमवलेली असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार टिपू पठाण याचे व त्याचे साथीदार यांचे मालकीची चारचाकी इनोव्हा कार आणि ३ दुचाकी जप्त करून त्याच्या सय्यदनगर परिसरातील अनाधिकृत कार्यालयाचे बांधकामावर महापालिकेच्या मदतीने बुलडोजर फिरवण्यात आला आहे. तसेच टिपू पठाण याचे घरझडतीमध्ये वेगवेगळ्या जागेचे कागदपत्रे, किंमती देखाव्याचे वस्तु, चैनिच्या वस्तु मिळुन आल्या.

ही कारवाई परिमंडळचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×