Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

बारामती शहरात १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

शहरातील साडे आठ हजार बालकांचे लसीकरण करण्याचे नियोजन

marathinews24.com

बारामती – शहरामध्ये १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात येणार असून ०-५ वयोगटातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे.

पुण्यात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

शहरामध्ये एकूण ८ हजार ५०० बालकांना एकूण ५२ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता एकूण दोनशे कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बालकांना लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घरोघरी जावून लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×