Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

क्लस्टर पद्धतीने लागवड करावयांच्या पिकांच्या लागवडीला गती द्यावी

क्लस्टर पद्धतीने लागवड करावयांच्या पिकांच्या लागवडीला गती द्यावी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करावयाचे निश्चित केलेल्या 10 पिकांच्या लागवडीस अधिक गती देण्यात यावी. या पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईला का याविषयी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समृद्धी योजनेंतर्गत दिशा कृषी उन्नतीची अनुषंगाने मुख्य उद्दीष्टे, प्रमुख दहा पिकांवर भर, 10 टक्के जिल्हास्तर निधीमधून प्रस्तावित बाबी, योजना संपृक्तता 80 टक्के निधीचे नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी समृद्धी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी महाविद्यालयाचे सहायक अधीष्ठाता डॉ. महानंद माने, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा कृषी अधिकारी एस.जे. पवार, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी, कृषी विभाग शास्त्रज्ञ तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत काचोळे यांनी सादरीकरणाद्वारे प्रमुख दहा पिकासाठी प्रस्तावित उपाययोजना, निर्यातक्षम केळी उत्पादन व प्रक्रीया, अंजीर प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीवर भर, निर्यातक्षत आंबा उत्पादन, निर्यातक्षम स्ट्रॉबेरी उत्पादन, करडई व सुर्यफूल तेलबिया प्रक्रिया, ऊस उत्पादकतेत स्थिरता राखणे, ज्वारी उत्पादन स्थिरता व प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती, शहरी भागात भाजीपाला पुरवठ्यास चालना देणे, भात उत्पादकता वाढ व प्रक्रियेस चालना देणे, सोयाबिन उत्पादकता वाढ व प्रक्रियेस चालना देणे आदी बाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेंतर्गत लागवड करण्यात आलेल्या आंबा, केळी, अंजीर, स्ट्रॉबेरी फळपिके व इतर समाविष्ट पिके लागवडी बाबतचे प्राप्त उद्दीष्ट व सध्या लागवड केलेले क्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती घेवून ते म्हणाले की, आंबा व केळी या फळपिकाच्या लागवडी करीता शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसत असून कृषी विभागाने मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य पुरवत शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे.

शेतकऱ्यांना फळपिकांच्या निर्यातीबाबत मार्गदर्शन करावे. निधीबाबत कमतरता पडल्यास शासनाकडून वाढीव निधी मंजूर करून घेण्यात येईल. आंब्याची लागवड लक्षात घेता जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचे आंबा क्लस्टर तयार होईल असेही ते यावेळी म्हणाले. करडई, सुर्यफूलाच्या बियाणांची समस्या संबंधित कंपन्यांशी बोलून तात्काळ सोडविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत कृषी समृद्धी योजनेंतर्गत दिशा कृषी उन्नतीची अनुषंगाने मुख्य उद्दीष्टे, प्रमुख दहा पिकांवर भर, 10 टक्के जिल्हास्तर निधीमधून प्रस्तावित बाबी, योजना संपृक्तता 80 टक्के निधीचे नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×