Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

दिवाळीनंतर नागरिकांची पुण्यात परतण्याची लगबग

दिवाळीनंतर नागरिकांची पुण्यात परतण्याची लगबग

पर्यायी मार्गांचा अवलंब करा; पोलिसांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुण्या-मुंबईकडे परतण्यास शुक्रवारपासून (२४ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. या प्रवाशांच्या मोटारी, खासगी बसमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘मोदी’ज मिशन’ या पुस्तकाचे मुंबईत राजभवन येथे झाले प्रकाशन – सविस्तर बातमी 

पुण्या-मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण वास्तव्यास आहेत. शिक्षणानिमित्त मोठ्या संख्येेने विद्यार्थी पुण्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीनंतर २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान महामार्गावरील वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. परगावांहून, तसेच परराज्यांतून अनेक जण पुण्या-मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, तसेच बाह्यवळण मार्गावरील वर्दळ वाढणार आहे. कोल्हापूरहून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील चाकण परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीचा वेग संथ होण्याची शक्यता आहे. सोलापूरहून पुण्याकडे मोठ्या संख्येने वाहने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. मोटारी, खासगी बसने पुण्याकडे येणे टाळावे. महामार्गावरील गर्दी आणि कोंडी विचारात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत प्रवास टाळावा. महामार्गालगतच्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. पोलिसांनी दिलेल्या नियमांचे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×