Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाची फसवणूक; दोघे गजाआड

ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या मुलाची फसवणूक; दोघे गजाआड

शिक्रापूर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली.

पिस्तूल बाळगणारा गजाआड; दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त – सविस्तर बातमी 

याप्रकरणी मयूर ऊर्फ शशिकांत मुंजाजी भिसाड (वय २१, रा. परभणी), तसेच किशाेर डहाळे (वय २२, रा. परभणी) यांना अटक करण्यात आली. याबाबत शाळकरी मुलाच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा भागातील एक शाळकरी मुलगा ऑनलाइन गेमच्या आहारी गेला होता. आरोपी भिसाड याच्याशी मुलाची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. भिसाड याने ऑनलाईन गेमच्या ‘गेमिंग आयडी’ देतो, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मुलाला घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. मुलनो घरातून घेतलेले दागिने आरोपी भिसाड याला नेऊन दिले. त्यानंतर भिसाडने हे दागिने परभणीतील साथीदार डहाळे याला दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तांत्रिक तपासात शाळकरी मुलगा आणि आरोपी भिसाड हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. दोघांमध्ये समाजमाध्यमातून संवादही झाला होता. भिसाडने मुलाला ‘गेमिंग आयडी’ देण्याचे आमिष दाखवून घरातून दागिने आणण्यास सांगितले. याबाबतची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन भिसाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ६२ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, विनायक मोहिते, प्रताप कांबळे यांनी ही कारवाई केली.

शाळकरी मुलांवर लक्ष ठेवावे

शाळकरी मुले समाजमाध्यमातील विविध आमिषांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. मुले ऑनलाइन गेमच्या आहारी गेले असून, पालकांनी मुलांना शक्यतो मोबाइल संच वापरास देऊ नये. मोबाइल फक्त गरजेपुरता वापरण्यास देणे. मुलांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास पालकांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×