Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे जिल्ह्यात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन

पुणे जिल्ह्यात 'वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन

‘वंदे मातरम’ गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गायन

marathinews24.com

पुणे – ‘वंदे मातरम’ गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या उपस्थित ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी महेश सुधाळकर, डॉ. चारुशिला देशमुख, सुरेखा माने, रामहरी भोसले, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उमाकांत कडनोर, सुनंदा भोसले, नायब तहसीलदार अपर्णा भोसले, सुयोग बेंद्रे, यांच्या कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन – सविस्तर बातमी 

देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु असलेला मुख्य कार्यक्रम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय, पुणे, व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. वंदे मातरमला समर्पित विशेष सभा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर तयार करणे आदी उपक्रम राबविण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×