नवीन कात्रज बोगद्याजवळील अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव दुचाकी वाहन चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हा अपघात ८ नोव्हेंबरला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ घडला आहे. दीपक जगन्नाथ हिरगुडे (वय २दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार५ रा. गणेश चौक, आंबेगाव पठार) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार वैâलास कदम (वय २४ रा. कात्रज) याने फिर्याद दाखल केली आहे.
मनी लॉड्रींगच्या नावाखाली ९९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओंकार कदम याचा मित्र दीपक हिरगुडे हा ८ नोव्हेंबरला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर नवीन कात्रज बोगद्यातून बाहेर पडत होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेला दीपकला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.























