पेट्रोल पंपावरील कामगारांच्या मारहाणीत दुचाकीस्वार तरुण ठार

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

वारजे पोलिसांकडून चार कामगारांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाला पंपावरील कामगारांना बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वारजे भागात घडली असून, तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी ४ कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

घरात गॅसगळतीने ९९ वर्षीय जेष्ठ गंभीर जखमी – सविस्तर बातमी

यश राजेंद्र पवार (वय २०, रा. कापडे, पोलादपूर, जि. रायगड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. राजेंद्र बाबूराव पवार (वय ५१, रा. रा. कापडे, पोलादपूर, जि. रायगड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पेट्रोल पंपावरील कामगार शिवराज अंबाराया गुत्ती (वय २३), जीवन महादेव कवे (वय २५, दोघे रा. अहिरे गाव, गणपती माथा, वारजे माळवाडी), संकेत धनाजी लंकेश्वर (वय २५, रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता), रितेश राजेंद्र गायकवाड (वय २२, रा. जय गणेश अपार्टमेंट, सह्याद्री शाळेजवळ, वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पवार यांचा मुलगा यश हा तीन मित्रांसोबत १३ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास वारजे माळवाडीतील शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुचाकी पंपावर रांगेत लावण्यावरुन वाद झाला. कामगारांनी यशला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलगा यशला पेट्रोल पंपावरील कामगारांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वडील राजेंद्र पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×