Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

वाळूखाली दबून बालकाचा मृत्यू

Pune Road Accidents

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – डंपरमधून वाळू उतरवित असताना वाळूखाली दबून पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भाेर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडली. दुर्घटनेत बालकाची आई, तसेच त्याचा भाऊ, चुलत बहीण वाळूखाली दबले गेले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – सविस्तर बातमी 

अलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याची आई आरती (वय ३५) भाऊ श्लोक (वय ६), चुलत बहीण प्रियंका (वय १५) हे जखमी झाले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरे कुटुंबीय नसरापूर परिसरातील धनगर वस्ती येथे राहायला आहेत. कचरे कुटुंबीयांचे जुने घर आहे. हे घर पाडण्यात आले असून, नवीन घर बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन घराचा पाया खोदून तेथे खांबही उभे करण्यात आले आहे. जवळच एका पत्र्याच्या शेडमध्ये कचरे कुटुंबीय राहायला आहे. शनिवारी (८ नोव्हेंबर) बांधकाम साहित्य पुरवठदाराकडून अशोक कचरे यांनी वाळू मागविली होती. दुपारी दीडच्या सुमारास धनगर वस्ती परिसरात वाळू घेऊन डंपर चालक तेथे आला.

बांधकामाच्या ठिकाणी डंपरमधून वाळू उतरविण्याचे काम करण्यात येत होते. त्यावेळी डंपरचालकाने कचरे कुटुंबीय राहत असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ वाळू उतरविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, डंपर चालकाच्या चुकीमुळे वाळू पत्र्याच्या शेडवर पडली. त्यावेळी शेडमध्ये अलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, प्रियंका होते. अचानक वाळूचा शेडवर पडल्याने पत्रा फाटला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली अलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, चुलत बहीण प्रियंका दबले गेले. रहिवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली. वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या चौघांना नसरापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

वाळूच्या ढिगाऱ्यााखाली सापडल्याने त्यांच्या नाका तोंडात वाळू गेली होती. बेशुद्धावस्थेतील अलोक याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याची आई, भाऊ, चुलत बहिणीव खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ओैदुंबर अडवळ यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×