नवले पुल अपघात प्रकरण
marathinews24.com
पुणे – शहराजवळ असलेल्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणार गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या ७ किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटर वरून ४० किलोमीटर एवढी करण्यात आली आहे. वेगमर्यादा निश्चित केल्यानंतर अवजड वाहन चालकांकडून सर्रास नियम धुडकाविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
बालकांच्या हक्काचे संरक्षण करुन महाराष्ट्र मजबूत करुया-सहआयुक्त राहुल मोरे – सविस्तर बातमी
साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. संबंधित कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मागार्वर नवले पूल परिसरात घडलेल्या गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहे. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसर सात किलोमीटर अंतर तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.
नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघात
(अपघात जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५)
वर्ष अपघात मृत्यू
२०२१ २१ २८
२०२२ २५ २७
२०२३ २२ ३१
२०२४ १८ २०
२०२५ ९ ९
पाच वर्षात तब्बल ११५ जणांचा मृत्यू
नवले पूल परिसरात परिसरात गेल्या ५ वर्षात ९५ गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातात ११५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. गेल्या पाच वर्षात ७२ गंभीर अपघात झाले आहेत. या अपघातात ९४ जण जखमी झाले आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षात प्राणांतिक, गंभीर, किरकोळ असे एकूण मिळून २५७ अपघात झाले आहेत.























