पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

केसरी वाडा ते अप्पा बळवंत चौकादरम्यान प्रवासात घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४८ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १३ नोव्हेंबरला दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास केसरी वाडा ते अप्पा बळवंत चौकादरम्यान प्रवासात घडली आहे. याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणार्‍या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन बहिणींना बेदम मारहाण, टोळक्याला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील रहिवाशी असून, १३ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास कामानिमित्त नारायण पेठेत आली होती. त्यानंतर महिला केसरीवाडा ते अप्पा बळवंत चौक असा बसप्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४८ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. बसमधून उतरल्यानंतर महिलेला गळ्यातील मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार खरात तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×