तरुणाला जादा परताव्याचे आमिष पडले २३ लाखांना

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २२ लाख ७५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३ ते १२ जुलै कालावधीत कात्रजमध्ये घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा कात्रजमध्ये राहायला असून, ३ जुलैला सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क केला. टास्कसंदर्भात बोलणी करून व्हॉटसअ‍ॅप गु्रपमध्ये अ‍ॅड केले. त्यानंतर जादा परतावा देण्याचे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अवघ्या काही दिवसांत सायबर चोरट्यांनी त्यांना तब्बल २२ लाख ७५ हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करीत आहेत.

आरटीओ चलनाच्या नावाखाली फसवणूक

आरटीओ चलनाच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल अडीच लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १ नोव्हेंबरला कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला आरटीओ चलनाची एपीके फाईल पाठवून त्यांना माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या बँकखात्याचा अ‍ॅक्सेस घेउन अडीच लाख रूपये स्वतःकडे वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×