Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

वनहक्क व पेसा कायद्यानुसार गौण वनोपज वाहतूक परवाना अधिकार ग्रामसभांकडे

वनहक्क व पेसा कायद्यानुसार गौण वनोपज वाहतूक परवाना अधिकार ग्रामसभांकडे

आदिवासी विकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

marathinews24.com

पुणे – अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ तसेच पंचायतराज व्यवस्था (PESA) १९९६ नुसार ग्रामसभांना गौण वनोपजाच्या वाहतुकीसंदर्भात असलेले अधिकार प्रत्यक्षात राबविण्यासाठी स्वतंत्र परवाना निर्गमनाचे अधिकार आता थेट ग्रामसभांना प्रदान केले आहेत.

नागरिकांना अधिसूचित सेवा विहीत कालावधीत उपलब्ध करुन द्याव्यात – सविस्तर बातमी 

यापूर्वी गौण वनोपज वाहतूक परवाने वनविभागामार्फत दिले जात होते. मात्र नवीन कार्यपद्धतीनुसार ग्रामसभा स्वतः वाहतूक परवाना छापून, क्रमांक जारी करून व निर्गमित करून संबंधित वन कार्यालयास माहिती देऊ शकतील. यामुळे वनहक्काच्या कायद्याने ग्रामसभांना दिलेले अधिकार प्रत्यक्षात बळकट होऊन स्थानिक आदिवासी व वननिवासी समाजाला स्वायत्तता लाभणार आहे.

शासन निर्णयातील ठळक बाबी गौण वनोपज वाहतूक परवाना निर्गमनाचा पूर्ण अधिकार ग्रामसभांकडे. वनविभाग यापुढे या परवान्यांसाठी अर्ज स्वीकारणार नाही. ग्रामसभेने जारी केलेल्या परवान्याचा क्रमांक संबंधित वन विभागास कळविणे बंधनकारक. जारी परवान्याची प्रत बिटगार्ड व वन कार्यालयाला सादर करणे आवश्यक. कोणताही संभ्रम निर्माण झाल्यास जिल्हास्तरीय वनहक्क समिती निर्णय घेईल — तथापि ग्रामसभेचे अधिकार अबाधित राहतील. पुढील काळात प्रक्रियेचे डिजिटलायझेशन, क्यु आर कोड आधारित परवाना प्रणाली लागू करण्याची मुभा ग्रामसभांना राहील.

या निर्णयामुळे आदिवासी पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना अधिकार प्राप्त होऊन स्वावलंबन व आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. वनसंपत्तीवरील समुदायाधिकार प्रत्यक्षात येण्यास मोठा हातभार लागेल, असे मत प्रदीप बा. देसाई, प्रकल्प अधिकारी (ए.आ.वि.प्र. घोडेगाव) यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×