मोबाइल चोरणार्‍या डिलीव्हरी बॉयला अटक

मोबाइल चोरणार्‍या डिलीव्हरी बॉयला अटक

बाणेर पोलिसांनी केली अट 

marathinews24.com

पुणे – तरूणाचा मोबाइल चोरणार्‍या डिलीव्हरी बॉयला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २४ नोव्हेंबरला पॅनकार्ड क्लब रोडवर घडली आहे. मदन कलम चंद (वय २५ रा. कामोठे, रायगड ) असे अटक केलेल्या कुरिअर बॉयचे नाव आहे. याप्रकरणी पिंपळे गुरवमध्ये राहणार्‍या २८ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वानवडीत मोबाइल टॉवरचे साहित्य चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्ल्यु डार्ट कंपनीत काम करणारा मदन चंद हा डिलीव्हरी बॉय आहे. २४ नोव्हेंबरला तो इनसिग्नीया तळमजला, वेस्टपोर्ट मॉल, पॅनकार्ड क्लब रोड याठिकाणी गेला होता. त्यावेळी त्याने १ लाख ३५ हजारांचा तरूणाचा मोबाइल चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी मदन चंद याला अटक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×