Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल

दोन महिलांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध विभागाने उघढकीस आणला. या कारवाईत मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी  

याप्रकरणी मसाज पार्लर व्यवस्थापक सुवर्णा संदीप क्षीरसागर (वय ३८, रा. कसबा पेठ), मसाज पार्लर मालक अश्विनी परेश कोळेकर (वय ३६, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघींना ताब्यात घेण्यात आले आहे. खराडी बाह्यवळण मार्गावर एका इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत मसाज पार्लर मालक अश्विनी कोळेकर, व्यवस्थापक सुवर्णा क्षीरसागर यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. कोळेकर आणि क्षीरसागर यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस कर्मचारी तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, दत्ताराम जाधव, बबन केदार, वैशाली इंगळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.

कोंढव्यात एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार

कोंढव्यात वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने काेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. गुरुवारी मध्यरात्री तरुण कोंढव्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातून निघाला होता. त्यावेळी टोळक्याने तरुणाला गाठले. त्याला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×