Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

बस वाहतूकदार संघटनांची आरटीओ कार्यालयात बैठक संपन्न

विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

marathinews24.com

पुणे – हिंजवडीत नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बस वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक सोमवारी पार पडली. बस वाहतुकीतील सुरक्षितता, प्रवासी संरक्षण आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विभागीय लोकशाही दिनात ३ प्रकरणांवर सुनावणी – सविस्तर बातमी

बैठकीदरम्यान बस चालकांनी निर्धारित वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून वाहने सुरक्षितपणे चालवावीत, यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चालकांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. तसेच बस चालकांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व चालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

प्रवाशांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी प्रत्येक बसमध्ये स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करावा, अशी सूचना यावेळी संघटनांना देण्यात आली. काही बस मालकांनी आपल्या वाहनांमध्ये ‘ब्रेद अ‍ॅनालायझर’ प्रणाली स्वखर्चाने बसविल्याची माहितीही देण्यात आली. या प्रणालीद्वारे चालकाची अल्कोहोल तपासणी पूर्ण झाल्याशिवाय बस सुरू होत नाही. इतर बस मालकांनीही ही प्रणाली स्वीकारून बसमध्ये बसवावी, असे आवाहन करण्यात आले.

संघटनांमार्फत बस व चालकांची संपूर्ण माहिती समाविष्ट करणारे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्याचे काम प्रगत अवस्थेत असून, त्याबाबतची माहितीही बैठकीत देण्यात आली. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हिंजवडी, चाकण व परिसरातील मार्गांवर बसची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून नियमबाह्य व दोषी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बस सेवेमुळे प्रवाशांचे हित, वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी यावेळी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×