Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची १७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – अटकेची भीती दाखवून (डिजिटल ॲरेस्ट) ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनी लॉड्रींग केसची केली बतावणी, १७ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी १२ डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘ काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार आहे,’ अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. याप्रकरणात अटक टाळायची असेल तर तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगितले.

त्यानंतर ज्येष्ठ महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात १२ ते १९ डिसेंबर या कालावधीत वेळोवळी १७ लाख रुपये जमा केले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक३ार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×