ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची सहा लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज भागात दुकानातून ६० हजारांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

तक्रारदार तरुण हडपसर भागात राहायला आहे. तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. चोरट्यांनी सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने एका काम करण्यास दिले. चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा केली. परताव्यापोटी रक्कम मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. तरुणाला चोरट्यांनी जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×