Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळले

कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळले

कोंढव्यातील श्रद्धानगर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागात असलेल्या एका चाळीत राहायला होते.

मेट्रोमोनिअलद्वारे लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे दाम्पत्य कोंढव्यात राहायला असून, त्यांचा मुलगा गणेश (वय २३) खासगी कंपनीत नोकरी आहे. तो शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळी रात्रपाळीवरुन घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद देण्यात आला नाही. त्याने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा त्याचे वडील प्रकाश आणि आई ज्ञानेश्वरी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

‘ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर आजार होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करायचे. पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×