Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

दुकानावर मारला ताबा, किंमती वस्तूंची चोरी

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

कॅम्पमधील एम जी रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – बक्षीसपत्रावर खोट्या सह्या करून एकत्रित कुटूंबियाच्या मिळकतीमध्ये दुसर्‍यानेच ताबा मारला. त्यानंतर दुकानातील किंमती वस्तू गायब केल्याची घटना जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२६ कालावधीत एम. जी. रोडवरील दुकानात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताविरूद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसपी नवनीत कॅावत यांच्या कारवाईने सट्टेबाजांचे साम्राज्य उध्वस्त – सविस्तर बातमी 

अशपाक अब्दुल रेहमान (रा. कोंढवा) सज्जाद लाडलेसाहब गाजेखान (रा. इस्ट स्ट्रीट कॅम्प) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज ओमर (वय ७२, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ओमर यांची आत्या पै नसीम आदम ओमर यांच्या एका बक्षीसपत्रावर खोट्या सह्या केल्या. त्यानंतर एकत्रितपणे असलेल्या कुटूंबियाच्या मिळकतीमध्ये त्रयस्त व्यक्तीचा शिरकाव केला. ओमर यांच्या ताब्यातील दुकानाचे (क्रमांक ११ व १२) कुलूप तोडून पुरातन वस्तू चोरून नेल्या. दुकानाचा ताबा स्वतःकडे ठेवला असून, इतर साहित्याची विल्हेवाट लावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×