Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्त स्त्री आधार केंद्रातर्फे ‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर दि.२४ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कायद्याचे प्रशिक्षण फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पुरुषांचाही यात सक्रिय सहभाग असावा. लवकरच किमान तीन ठिकाणी असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर – सविस्तर बातमी 

याशिवाय प्रत्येक शाळेतील स्कूल बसमध्ये परिचारिका नेमण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्री आधार केंद्राकडून शाळांना पत्र पाठवले जाणार आहे. गुड टच आणि बॅड टचबाबत जागृती कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत. स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसाठी विधानभवन पाहणी दौराही लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान आरोग्य विषयावरही खुली चर्चा झाली. महिलांची सुरक्षितता, सक्षमीकरण आणि समुपदेशन या विषयांवरही लवकरच चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. ‘Transform Her’ या महिला उद्योजक गटातील महिला उद्योजकांनीही या परिसंवादात सहभाग घेतला.

कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, अपर्णा पाठक, आश्लेषा खंडागळे, अनिता शिंदे, नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिका नगरसेविका पदाच्या उमेदवार वैष्णवी किराड, सायली पवार, सोनाली लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×