Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पोलीस ठाण्यातून पसार होण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारुन पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. साहिल सादिक शेख (वय २१, रा. इंदिरानगर, बर्मा शेल, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन पवार यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अंबाजोगाईत घरफोडी; ११ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल शेखला एका गु्न्ह्यात विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ३१ जानेवारीला रात्री अकराच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार होती. त्या वेळी शेखने उलटी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील कक्षात त्याला ठेवण्यात आले होते. त्यावेळी पोलीस शिपाई पवार त्याच्याबरोबर होते. शेखने पवार यांचा हात झटकला. पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलीस शिपाई पवार यांनी प्रसंगावधान राखून शेखला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुगडे तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीतून एकाने उडी मारुन आत्महत्या केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×