Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

उकळी पेन येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी

समता उपासक संघ व समता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जयंती कार्यक्रम संपन्न

marathinews24.com

वाशीम – वाशीम मधील मौजे उकळी पेन येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त समता उपासक संघ आणि समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, संघर्ष आणि समाजप्रबोधनातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

नुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ – सविस्तर बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत त्यांच्या यशामध्ये रमाईचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकण्यासाठी गेले, त्या परिस्थितीत सुद्धा माता रमाईंनी त्यांचा संसार गाडा मोठ्या हिमतीने चालविला. घरी अठरा विश्व दारिद्र्य तरीसुद्धा त्या माऊलीने खंबीरपणे आपल्या परिवाराची काळजी घेतली. तिचे चार मुलं पैस्याअभावी उपचार मिळाले नाही म्हणून मातीआड झाली. चार मुलाचे निधन झाले तरीसुद्धा त्या माऊलीने ती झळ डॉक्टर बाबासाहेबांना पोहोचू दिली नाही. आणि त्यामुळेच भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले. आणि आपल्या देशाला सुंदर संविधान देऊ शकले.त्या संविधानाच्या प्रत्येक पानावर रमाईच्या त्यागाचे, कष्टाचे, घामाचे थेंब आहेत. म्हणून रमाईचा त्याग हा खूप मोठा आहे. तो विसरता कामा नये.

या महामातेच्या त्यागाचा जागर करण्यासाठीच कार्यक्रमाचे आयोजन केल होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य जनार्दनजी इंगोले यांनी केले. बौध्द उपासिका मथुराबाई खडसे, देवकाबाई भगत, मंगलाताई कांबळे, पूजाताई कांबळे, यशोदाबाई लबडे, उज्वलाबाई इंगोले, द्वारकाबाई भालेराव, कमलाबाई भगत, बुगणाबाई हनुमते, गंगाबाई भगत, जानकाबाई इंगोले, सुवर्णाबाई सुर्वे, निर्मलाबाई इंगोले, गंगाबाई खडसे, अनिता बाई ठोके, तसेच ज्येष्ठ उपासक संभाजी भगत, चंपत इंगोले, मनोहर उचीत, साहेबराव कांबळे, आकाश इंगोले, प्रवीण इंगोले, किरण भगत, कचरू भगत, सुबोध उचीत, अनिल भगत, करण इंगोले, मुकेश भगत,आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता फाउंडेशनचे अध्यक्ष तथा समता उपासक संघाचे संघनायक दिपक लबडे यांनी माता रमाईच्या जीवन संघर्षावर, त्यांच्या महान कार्यावर आपल्या शब्दाने उजाळा टाकण्याचे काम केलं. आणि त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाचा समारोप गावातील सर्व मंडळींना खिचडीचे वाटप करून करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×