Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

उकळी पेन येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उकळी पेन येथे शिवजयंती उत्साहात साजरी

समता फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

marathinews24.com

वाशीम – उकळीपेन येथे समता फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक उत्सवच असतो. सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी तो एक आनंदाचा उत्सव असतो.

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा – सविस्तर बातमी 

ज्यांनी जुलमी सत्तेच्या विरोधात बंड केले, मूठभर मावळे घेऊन शत्रूच्या अफाट सैन्यावर विजय मिळवला, ज्यांच्या राज्यात प्रत्येक प्रजा सुखात होती, अश्या महाराजांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठीच समता फाउंडेशनच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

याप्रसंगी ज्येष्ठ उपासक संभाजी इंगोले, किसन भगत, रामजी भगत, मनोहर उचित, साहेबराव कांबळे, सिताराम भगत, कचरू भगत, संजय भगत, किरण भगत, सुधाकर दिपके, किरण कुंडलिक भगत, रवी भगत, पै. लक्ष्मण भगत, प्रवीण इंगोले, अनिल भगत, कैलास भगत, सचिन भगत, सुबोध उचित, कबीर वाघमारे, बुद्धभूषण कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता फाउंडेशन अध्यक्ष दिपक लबडे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी समता उपासक संघाच्या सर्व महिला देखील हजर होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा जातीपातीचा भेद न मानता संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ केला होता, त्यांचाच हा समतेचा विचार आपल्या आचरणात आणून आपल्याला सुद्धा एकत्र येऊन सर्वाची प्रगती साधायची आहे. असे विचार दिपक लबडे यांनी मांडले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×