Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल

कौशल्यविकास आणि लघुउद्योगातून महिलांना रोजगाराच्या नव्या संधी

marathinews24.com

पुणे – महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नाही; तो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ‘पुणे पॅटर्न’कडे पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते…समन्वय, सातत्य आणि स्थानिक गरजांनुसार आखलेले सुयोग्य नियोजन यामुळेच महिलांच्या आयुष्यात ठोस आणि दीर्घकालीन बदल घडू शकतात. परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम लाभलेल्या पुणे जिल्ह्याने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राज्यात आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल २२ हजार महिला बचत गट जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. लघुउद्योग, घरगुती उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय अशा विविध माध्यमांतून महिलांनी केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवले नाही, तर कुटुंबाच्या आणि गावाच्या अर्थचक्रालाही गती दिली आहे.

राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

पुणे जिल्हा ही संतांची, विचारांची आणि शौर्याची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अध्यात्मिक वारशाने समाजमन घडवले; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत स्त्रीशक्तीचा सन्मान अंतर्भूत होता. राजमाता जिजाऊ यांनी घडवलेल्या संस्कारांची परंपरा आजही प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातूनच महिला सन्मान आणि सक्षमीकरणाची बीजे रुजली आहेत. ‘पुणे पॅटर्न’ची हीच खरी ताकद आहे. पुणे जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास प्रशिक्षणातून रोजगारनिर्मिती तसेच अंगणवाडी सेवांद्वारे पोषण आणि आरोग्य या सर्व बाबी एकत्रितपणे हाताळण्याचा प्रयत्न ‘पुणे पॅटर्न’मध्ये दिसून येतो. विशेषतः ग्रामीण भागात स्वयं-सहायता बचत गटांनी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा दिली आहे. सूक्ष्म वित्तपुरवठा, उत्पादन-विक्री साखळी, स्थानिक बाजारपेठांशी जोडणी आणि डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण यामुळे महिलांनी छोट्या उद्योगांपासून सेवा क्षेत्रापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध गटांनी कृषी प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय आणि हस्तकला या क्षेत्रांत यशस्वी पावले टाकली आहेत.
याचबरोबर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पोषण अभियान तसेच किशोरी विकास कार्यक्रमांद्वारे मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे.

किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी, रक्तक्षय निर्मूलन मोहीम आणि मार्गदर्शन शिबिरे यांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढत आहे. ‘पुणे पॅटर्न’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, भोर आणि वेल्हा हे डोंगरी तालुके. या भागात आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. या भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, बँका, उद्योग संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील सहकार्यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आहे. महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शन, विपणन सहाय्य आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीदेखील महत्त्वाची पायरी ठरली आहे.

महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व निर्माण करणे आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे होय. पुणे जिल्ह्यातील अनेक महिला सरपंच, उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या या बदलाचे प्रतीक ठरल्या आहेत. आज गरज आहे ती या मॉडेलचा अधिक विस्तार करण्याची. डिजिटल साक्षरता, हरित उद्योजकता आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवणे हे पुढील टप्प्यातील उद्दिष्ट आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाल्यास समाज सुदृढ होतो – हीच ‘पुणे पॅटर्न’ची प्रेरणा आहे.

महिला दिन हा केवळ उत्सव नसून कृतीची नवी दिशा देणारा दिवस आहे. ‘पुणे पॅटर्न’च्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाची वाट अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. बचत गट हे केवळ आर्थिक व्यवहारांचे व्यासपीठ नसून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामूहिक निर्णयक्षमतेची शाळा ठरत आहेत. ग्रामीण भागातील अनेक महिला आज ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विकास समित्यांमध्ये ठामपणे आपले मत मांडताना दिसतात. महिलांना केवळ मदत करण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवणे हीच खरी सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे.

आज पुणे जिल्ह्यातील महिला केवळ घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य आणि प्रशासन या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे ‘पुणे पॅटर्न’ अधिक परिणामकारक ठरला आहे. महिला दिन हा केवळ गौरवाचा दिवस नसून पुढील वाटचालीचा संकल्प करण्याचा क्षण आहे. महिला सक्षमीकरणाच्या या सक्षम वाटचालीतून ‘पुणे पॅटर्न’ राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठीही प्रेरणादायी ठरत आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि नेतृत्व यांवर आधारलेले हे परिवर्तन अधिक व्यापक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच विविध लोककल्याणकारी योजना तसेच सामाजिक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. समाजातील गरजू , संकटग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. अधिक माहितीसाठी १०९१ आणि १०९८ या टोलफ्री क्रमांक तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

रोहिणी ढवळे – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×