Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

उड्डाणपुलामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार

marathinews24.com

पुणे – पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

‘सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

पीएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×