कसबा पेठेत घरफोडी; ६ लाखाचे दागिने चोरीला

हडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कसबा पेठेतील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुखाची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह कसबा पेठेतील पवळे चौकात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. ६ मार्च रोजी सायंकाळी तक्रारदार आणि कुटुंबीय सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सहा लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. रात्री अकराच्या सुमारास घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गजबजलेल्या पवळे चौकात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवासी भयभीत झाले. घरफोडी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×