Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पुन्हा अपघात

वाहने एकमेकांवर आदळली; सुदैवाने जिवितहानी नाही

marathinews24.com

पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात अपघातांचे सत्र कायम आहे. शनिवारी मध्यरात्री बाह्यवळण मार्गावर दरी पूल परिसरात वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

बाह्यळण मार्गावरील जांभुळवाडी येथील दरी पूल परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात वाहनांचे नुकसान झाले. अपघातात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यवर प्राथमिक उपचार करण्यात झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. बाह्यवळण मार्गावर रात्री वर्दळ कमी नसल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. क्रेनच्या सहायाने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूल काढण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात १३ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. तीव्र उतारावर त्याने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×