Breking News
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वनराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफपोलिसांचा २ किलो काकड्यांसाठी दुखावलेला इगो, अन शेतात शेतकऱ्याने केले लाँकडाऊन…ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण योगदान द्यावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेगांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, २ किलो गांजा जप्त…पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाईपुण्यात सराईतांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्तधरणातील गाळ काढण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डासिंहगड रस्ता भागात घरफोडी, १ लाखांचा ऐवज चोरीला…

पुणे : कुस्तीच्या आखाड्यात वादातून हाणामारी

मारहाण करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – गावाेगावी ग्राम दैवताच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. गावातील वार्षिक उत्सवात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

शंकर ठोंबरे (वय ३८), सुनील ठोंबरे (वय ४०), सुनील जांभळकर (वय ४२), संतोष जांभळकर (वय ३७), सागर जांभळकर (वय २७), विशाल जांभळकर (वय २९), गणेश जांभळकर (वय ३५, सर्व रा. बुर्केगाव, नगर रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष महादू पवळे (वय ४९, रा. बुर्केगाव) यांनी लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन लवकरच – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला. वादातून ठोंबरे, जांबळकर यांनी अभिजित बाजारे, संदीप थोरात, सौरभ बाजारे, अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्क्या, काठीने मारहाण केली. आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबराट उडली. पोलिसांनी याप्रकरणी गर्दी, तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top