Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

चंद्रपूरच्या मथुराताई पुनर्वसन प्रकरणाचा आढावा

चंद्रपूरच्या मथुराताई पुनर्वसन प्रकरणाचा आढावा

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

marathinews24.com

मुंबई – नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. घरकुल योजनेअंतर्गत घराचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सध्या प्लास्टरचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेद्वारे कुटुंबाला नियमित रेशन मिळत आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) चौकीदार म्हणून नोकरी देण्यात आली असून, आर्थिक स्थैर्यासाठी १० लाख रुपयांपैकी ७ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) सुपूर्द करण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने निवारा, रोजगार आणि आर्थिक मदत या तिन्ही स्तरांवर समन्वित कार्यवाही केली आहे. ग्रामसेवक व स्थानिक प्रशासनामार्फत योजनांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, उर्वरित बाबींबाबत उपसभापतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आर्थिक मदतीतील शिल्लक ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ वितरित करावी, घराचे उर्वरित २० टक्के बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करून कुटुंबाला लवकरात लवकर घर हस्तांतरित करावे, तसेच आरोग्य, रोजगार व उपजीविका या सर्व बाबींचा समावेश असलेली सर्वसमावेशक पुनर्वसन योजना राबवावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, कार्यवाहीचा नियमित प्रगती अहवाल उपसभापती कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मथुरा ताई यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाला गती मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×