Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

सेफ्टी लोखंडी जाळीचे पाईप अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

सेफ्टी लोखंडी जाळीचे पाईप अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

बाणेरमधील घटना, ठेकेदारासह बिल्डरवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेरमधील बहुमजली इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून सेफ्टी लोखंडी जाळीचा पाईप खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. पाईप थेट खाली काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात पडला. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. करीम चमत्कार शेख (वय ३५, रा. लेबर कॅम्प, बावधन) असे मृत्यू झालेल्या कामगाराचा नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात ठेकेदार, बिल्डर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत करीम यांचा मेव्हणा रबिऊल राहीद शख यांनी तक्रार दिली आहे. ही घटना २८ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

ज्येष्ठ महिला सोनसाखळी चोरट्यांच्या टार्गेटवर – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, वायआरके व्हेंचर्स या कंपनीमार्फत बाणेरमधील पल्लोड फार्मस याठिकाणी यु.व्ही.होम्स कन्स्ट्रक्शनचे कामकाज सुरू आहे. बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. यादरम्यान, १५ व्या मजल्यावर सेफ्टी लोखंडी जाळी बसविली होती. त्याला पाईप देखील बसवलेले असतात. दरम्यान, करीम हा इमारतीच्या खाली काम करत होता. तेव्हा अचानक या जाळीचा एक पाईप खाली पडला. तो करीम याच्या अंगावर पडला. यात गंभीर जखमी झाल्याने करीम यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न करता कामगारांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येईल, असे हयगयीने व निष्काळजीपणे कृत्य केल्याने पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदार, बिल्डर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×