Breking News
Pune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे  – शेअर ट्रेडींग जाहिरातीची लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल १४ लाख १० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १२ मार्च २०२४ ते २७ जानेवारी २०२६ कालावधीत कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील खोक्या उर्फ सतीश भोसले याची निर्दोष सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रजमधील राजेश सोसायटीत राहायला असून, १२ मार्च २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर ट्रेडींग जाहिरातीची लिंक पाठवली. त्यानंतर ट्रेडींगच्या पोर्टलवर जाउन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केल्यानंतर विविध बँकखात्यात रक्कम पाठवण्यास भाग पाडले. तब्बल १४ लाख १० हजार रूपये ऑनलाईनरित्या पाठवल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×