Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

अपघात प्रकरणात टँकर मालकासह चालकाला अटक

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

शितल पेट्रोल पंपाजवळ झाला होता अपघात

marathinews24.com

पुणे – टँकर व दुचाकीच्या अपघातप्रकरणात पोलिसांनी चालकासह टँकर मालकाला अटक केली. चालक दारूच्या नशेत टँकर चालवित होता. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात १९ वर्षीय तरुणाला मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानंतर ही कारवाई केली आहे. टँकर मालक नितीन मधुकर ननावरे (वय ४६, रा. कोणार्कपुरम सोसायटी) चालक रवींद भीमराव दनाने (वय ३४) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अपघातात आरिज एजाज शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

लष्कराच्या एआयपीटीमधून ५ ट्रॉफी, दोन ब्रॉंझ सिल्व्हर ट्रॉफींची चोरी – सविस्तर बातमी

टँकर नितीन ननावरे याचा आहे. तर, रवींद्र दनाने त्यावर चालक म्हणून काम करत होता. पण, रवींद्र याला दारूचे व्यसन आहे. ही गोष्ट मालक नितीन याला माहिती होती. तरीही त्याने त्याला नोकरीस ठेवले आणि त्याच्या ताब्यात टँकर देखील चालविण्यास दिला. दरम्यान, घटनेच्या दिवशी रवींद्र हा दारू पिऊन टँकर चालवित शीतल पेट्रोल पंपाजवळून जात होता. तेव्हा दुचाकीस्वार आरिज हा तेथून जात असताना रवींद्र याने त्याच्या दुचाकीला पाठिमागून धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. पोलिसांनी प्रथम रवींद्र याला अटक केली. चौकशीनंतर त्याला दारूचे व्यसन असल्याचे तसेच अपघाताच्यावेळी तो दारू पिला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी टँकर मालक नितीन ननावरे यालाही जबाबदार धरत अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×