Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

धक्कादायक मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे घर फोडले

चोरट्यांचा धुमाकूळ; पाच घरे फोडली; शेतकऱ्यांचे विद्युत पंप चोरीला

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये १० एप्रिलला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह पाच घरे फोडून घरातील कपाटातील दागिनेसह पैसे चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे गावातील अंदाजे तीस ते चाळीस शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटरीसह वायर चोरून नेले तर काही शेतकऱ्यांची वायर जाळून टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा – सविस्तर बातमी

या घटनेची माहिती केज पोलीसांना समजताच केज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वैकुंठराम खाझड, पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरसुपे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बट्टेवार , पोलीस कर्मचारी दिलीप गिते यांच्यासह डी बी पथकांचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मोटरीसह वायर चोरी गेले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन व गावातील ज्यांच्या घरी चोरी झाली आहे त्याच्या घरी जाऊन पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने मस्साजोग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये चोरट्यांनी एकूण पाच ते सहा घरे फोडली आहेत. त्यामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घराततील कपाट फोडून त्यातील साहित्य फेकून दिले तर अच्चीत पंढरीनाथ देशमुख यांचे घर फोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे.तर दत्तात्रय बाबुराव देशमुख यांचे कुटुंब समोरच्या खोलीत झोपलेले असताना घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश कपाट उघडून आत मधील साहित्य घरात फेकून दिले.

तर प्रवीण श्रीधर देशमुख यांचे घर फोडून घरातील कपाटातील दागिने आणि पैसे चोरी गेले आहेत तर सुधाकर नागोराव सोनवणे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घराच्या दरवाज्याच्या कडी लावून सुधाकर सोनवणे यांनी आरडाओरडा केल्यामुळे त्यांच्या घरातील चोरीचा अनुचित प्रकार टळला आहे. तर अनंत मंचीकराव देशमुख यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील साहित्य फेकून दिले आहे. प्रकरणाने मस्साजोग परिसरात एकच खळबळ उडाली. गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी केज पोलीस या घटनेचा तपास करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×