Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती

४० फूट उंच प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधले

marathinews24.com

पुणे – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. बोपोडी परिसरात उभारण्यात आलेली महाबोधि विहार, बोधगया येथील विहाराची तब्बल ४० फूट उंच प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

भिमजयंती डीजे मुक्त साजरी करण्याच्या निर्णयाचे अनुयायांकडून जोरदार स्वागत – सविस्तर बातमी

या देखाव्याचे उद्घाटन भन्ते नागघोष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित भिक्षू संघांनी बौद्ध मंत्रोच्चार करून वातावरण भक्तिमय केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या देखाव्याला भेट देत अभिवादन केले.

ही भव्य प्रतिकृती पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. आकर्षक प्रकाशयोजना, देखणी सजावट आणि सूक्ष्म कलाकुसरीमुळे या प्रतिकृतीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. उद्घाटन प्रसंगी रिपाईचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष  अविनाश कदम, नगरसेवक सनी निम्हण, सपना छाजेड, भक्ति गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकर जयंतीनिमित्त बोपोडी परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य देखाव्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महाबोधि विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी ही भव्य प्रतिकृति उभारली आहे. तसेच या प्रतिकृतीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजूषा नागपुरे भेट देणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×