दोन विद्युत पंपासह सहा शेतकऱ्यांचे १२५० फूट वायर लंपास
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पाझर तलावातील मागील एक ते दीड महिन्याखाली चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांचे वायर चोरट्यांने चोरी करून नेल्याची घटनेला विसर पडत नाही. तोपर्यंत चोरीची दुसरी घटना घडली आहे. दोन शेतऱ्यांच्या विद्युत पंपासह वायर आणि चार ते पाच शेतकऱ्यांच्या मोटारीच्या वायरची चोरट्याने चोरी करून नेऊन दुष्काळात तेरावा झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) मध्यरात्री घडली आहे. चोरीची घटना सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली आहे.
कॉलसेंटरच्या बहाण्याने ७१ लाखांची फसवणूक; दोघांना अटक- सविस्तर बातमी
चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतापाची लाट आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांचा माग काढून लवकर चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी मस्साजोग येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या चोरीच्या घटनेत सुदर्शन देशमुख, सुनील गायकवाड यांच्या पाच इंच एचपीचा पंप आणि २५० फूट वायर चोरून नेली आहे. मदन जिवनराव देशमुख यांच्या शेतातील २०० फूट वायर, तर फुलचंद दिंगाबर देशमुख २०० फूट वायर, परमेश्वर सदाशिव देशमुख २०० फूट वायर , प्रवीण प्रकाश देशमुख २०० फूट वायर मिळून १२५० फूट वायर आणि दोन विद्युत चोरून नेले आहेत. पंपाची किंमत अंदाजे १ लाख रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती शेतकरी सुदर्शन देशमुख यांनी दिली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.





















