Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुण्यातील कोचिंग क्लास शिक्षक, लातूरमधील डॉक्टरला बेड्या

marathinews24.com

पुणे – देशभरात गाजत असलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपींपैकी एकजण पुण्यातील कोचिंग क्लास शिक्षक असून, दुसरा लातूरमधील डॉक्टर आहे. डॉ. मनोज शिरूरे आणि तेजस हर्षदकुमार शाह अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून, दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरमधील संबंधित आरोपींकडून कसून चौकशी केली जात आहे. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघडकीस आले आहे.

इलेक्ट्रीक दुकानातून वायरीचे बंडल, रोकड चोरी – सविस्तर बातमी

नीट पेपरफुटीमुळे १२ मे रोजी सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार संंबंधित परिक्षा रद्द करीत याप्रकरणी गुन्हा दाखल करीत केंद्र सरकारने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआय पथकाने देशभरात छापेमारी करीत अनेकांनी चौकशी करीत आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत पुण्यातील कोचिंग क्लास शिक्षकासह लातूरमधील एका डॉक्टरचा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सीबीआयने नव्याने लातूरमधील डॉक्टर मनोज शिरूरे आणि पुण्यातील कोचिंग क्लास शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांना अटक केली आहे. यातील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी सीबीआयकडून तपास सुरू असून, आतापर्यंत देशभरातील ४९ ठिकाणी छापेमारी केली आहे. कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त केले असून त्याचे सखोल विश्लेषण सुरू आहे.

म्हणून सीबीआयने दोघांना केली अटक

लातूरमधील डॉक्टर डॉ. मनोज शिरुरे याने आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न मिळवले. त्यानंतर संबंधित प्रश्न ३ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते. या विद्यार्थ्यांमध्ये एका आरोपी कोचिंग सेंटर चालकाच्या मुलाचाही समावेश असल्याचे सीबीआयच्या तपासात निषन्न झाले. तर दुसरा आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हा पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडीकल अ‍ॅकेडमी या कोचिंग संस्थेत भौतिकशास्त्र विषयाचा शिक्षक आहे. त्याने अटकेतील आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून नीटच्या भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे.

देशात ४९ ठिकाणी छापेमारी, १३ जणांना अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने देशभरात ४९ ठिकाणी छापेमारी करीत महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले. याप्रकरणी १३ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार दरदिवशी नवनवीन खुलासे होत असून, प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे सीबीआय कारवाईवरून दिसून आले आहे. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा निष्पक्ष आणि सर्वंकष तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×