Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

चांगल्या परताव्याचे आमिष पडले २६ लाखांना

तरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना...

तब्बल २६ लाख १७ हजारांचा ऑनलाईन घातला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २६ लाख १७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २२ एप्रिल ते १७ मे २०२६ कालावधीत शिवाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवाजीनगरमध्ये राहायलास असून, २२ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठवून अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करण्यात आली. विश्वास संपादित झाल्यानंतर संबंधित गुंतवूणकीला सुरूवात केली. अवघ्या एका महिन्यांत २६ लाख १७ हजारांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या बहाण्याने तरूणाला ८ लाखांना फसवले

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाला ८ लाख ३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ ते १६ जानेवारी २०२६ कालावधीत नारायण पेठेत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.

सायबर चोरट्यांचा जेष्ठाला १९ लाखांडा गंडा

पुणे- इन्स्टाग्रामद्वारे जेष्ठ नागरिकाला लिंक पाठवून व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्यानंतर सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल १९ लाख ५२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १६ जून ते १ ऑगस्ट २०२५ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोंढव्यात राहायला असून, १६ जून २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला. लिंक पाठवून त्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले. अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून शेअरमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादित केला. त्यानंतर गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे सांगून तब्बल १९ लाख ५२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×