पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६
marathinews24.com
पुणे – भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडील १८ मे २०२६ रोजी प्रसिद्धी पत्रकान्वये विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ जाहीर झाली आहे; या अनुषंगाने पुणे जिल्हास्तरावर निवडणूक विषयक विविध कामकाजाच्या अनुषंगाने नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
कर्नाटकातील शहाजीराजे यांच्या समाधीला संरक्षण कवच; समाधीवर ४५० किलोची भव्य मेघडंबरी – सविस्तर बातमी
सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मतदान पेटी व्यवस्थापन व निवडणूक साहित्य आणि स्टेशनरी व्यवस्थापन, वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापन, उमाकांत कडनोर, तहसीलदार यांच्याकडे अधिकारी व कर्मचारी नियुक्ती आणि मतपत्रिका छपाई व वाटप, संदीप कदम, उपायुक्त यांच्याकडे वाहन अधिग्रहण, वाहन व्यवस्थापन व वाहतूक आराखडा, संगीता मिना, एनआयसी यांच्याकडे संगणकीकरण व्यवस्थापन व मतमोजणी नमुने तयार करणे, सतीश थेटे, श्वेता पवार तहसीलदार आणि दिलीप शिंदे, पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉमेंट आराखडा तसेच आदर्श आचारसंहिता व्यवस्थापन, देवराम शेळके, सहसंचालक यांच्याकडे निवडणूक खर्च व्यवस्थापन विषयक कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे.
युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूकअधिकारी, शीतल मुळे-भामरे, निवडणूक तहसीलदार, मुकेश कोळप सहायक आयुक्त पिंपरी-चिंचवड मनपा आणि ॲलीस पोरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मतमोजणी आराखडा व स्टाँग रुम व्यवस्थापन आणि स्वप्नील खोल्लम, निवडणूक तहसीलदार यांच्याकडे निवडणूक विषयक दस्ताऐवज जतन करणे आणि विहीत पद्धतीने विल्हेवाट लावणे याकामी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली आहे.





















