खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाला धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ केल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. रोहन गौतम साळवे (वय २६, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई चंद्रशेखर हुणचळगी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वारजे माळवाडीत, मुंढव्यात दारूविक्रीवर कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साळवे हा शुक्रवारी (५ जून) दुपारी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत होता. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन खडक पोलीस ठाण्यात आणले. त्या वेळी साळवे याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. पोलीस शिपाई हुणचळगी यांनी धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणला. शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, तसेच मारहाण केल्या प्रकरणी हुणचळगी याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करत आहेत.
कचरावेचक महिलेला मारहाण
कचरावेचक ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी राज दिनकर माळी (वय २७, रा. निवारा हाऊसिंग सोसायटी, कोपरागाव, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ट महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला कचरावेचक आहेत. त्या ४ जून रोजी छत्रपती शिवाजी रस्त्यावरील सुशील लाॅजसमोरील गल्लीत ४ जून रोजी मध्यरात्री कचरा वेचत होता. त्या वेळी आरोपी माळी तेथे आला. त्याने महिलेकडे मोबाइल संच मागितला. एकाशी संपर्क साधायचा आहे, असे त्याने महिलेला सांगितले. महिलेने त्याला मोबाइल संच देण्यास नकार दिल्यानंतर माळी याने त्यांना मारहाण केली. पोलीस हवालदार टकले तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीनाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी सागर बोरगे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीनाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. शुक्रवारी (५ जून) रात्री आठच्या सुमारास तो आंबेगाव परिसरातील राजमाता जिजाऊ भुयारी मार्गाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.






















