Breking News
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्री

पिस्तुल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

अल्पवयीनाकडून पिस्तुल जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड असा ५० हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना कात्रजकडुन मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एकजण गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा जप्त केला.

अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×