Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिला गजाआड

साडेचार लाखांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक करण्यात आली. दागिने चोरणाऱ्या महिलांनी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लिलाबाई भोलेनाथ खंदारे (वय ६५), चंदाबाई छबू लोंढे (वय ६८, दोघी मूळ रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), अश्विनी अविनाश भोसले (वय २७, रा. गणगेवाडी माही जळगाव,ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सिया, चेतनच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ – सविस्तर बातमी

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलेकडील दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पोलीस कर्मचारी सुजय पवार आमि सागर केकाण यांनी दागिने चोरणाऱ्या महिलांचा शोध सुरू केला. तपासात दागिने चोरणाऱ्या महिला अहिल्यानगरमधील सलबतपूरच्या रहिवासी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघींना सलबतपूरमधून ताब्यात घेतले. दोघींकडून एक लाख ४० हजार रुपयांचे एक तोळ्यांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी महिलेकडील दागिने चोरुन नेण्याची घटना नुकतीच घडली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलीस कर्मचारी सागर काळे, हर्षल शिंदे यांनी दागिने चोरणाऱ्या महिलेची माहिती मिळवली. अश्विनी भोसले हिने दागिने चोरीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पोलिसांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील मूळगावातून ताब्यात घेतले. एसटी स्थानकात दागिने चोरी प्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ, प्रदीपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक बाळू शिरसट, अश्रृबा मोराळे, नाना भांदुर्गे, सागर केकाण, प्रशांत टोणपे, सुजय पवार, हर्षल शिंदे, सागर काळे, हनुमंत दुधे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण, सुवर्णा सांगोलकर, अनिता घायतडक यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×