पुणे जिल्ह्यात १५७४ गावात “एक गाव एक पोलीस ” योजना

पुणे जिल्ह्यात ‘एक गाव एक पोलीस’ योजनेचा विस्तार १५७४ गावांपर्यंत

marathinews24.com

पुणे – ग्रामीण पोलीस दलासह जनतेतील संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आता पोलीस दल सरसावले आहे. गावोगावी घडणाऱ्या घटना, गुप्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे राहण्यासाठी एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार” ही नवीन तंत्रज्ञान सक्षम योजना १ मे २०२५ पासुन सुरू केली आहे.पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये योजना राबवित सुरवात झाली आहे.

येरवाड्यात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित – सविस्तर बातमी 

जिल्ह्यातील १३ तालुके, ३३ पोलीस स्टेशन, १५७४ गावांसह वाडया वस्त्या समाविष्ठ आहेत. योजनेसाठी १२९२ पोलीस पाटील व १५२५ पोलीस अंमलदार हे प्रत्येक गावासाठी नेमण्यात आले आहेत. योजनाकरीता “सुरक्षित पुणे ग्रामीण” या मोबाईल ॲपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांची नोंदणी केली आहे.सुरक्षित पुणे ग्रामीण या मोबाईल ॲपद्वारे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांनी गाव भेट देताना, त्यांचे जिओ टॅग लोकेशन व फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे. जेणे करुन, प्रभावीपणे ही योजना अंमलात आणता येईल.

एक गाव आणि बारा भानगडी, असे म्हणत गावातील भांडणातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाला आहे. याशिवाय गावपातळीवर पोलीसांची प्रतिमा निरोगी व परस्पर विश्वासाच्या वातावरणाची निर्मीती व्हावी याकरीता गावातील पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांमध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याकरीता, पोलीस व जनतेमध्ये विश्वास निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे सामुदायिक पोलीसिंगला चालना देणे, महिला व बालकांच्या संबंधित गुन्हयामध्ये तातडीने कारवाई करणे, त्यांना योग्य न्याय मिळवुन देणे हा उपक्रमाचा उददेश आहे.

कोट- जिल्ह्यातील नागरिकांची कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, गावोगावी घडणाऱ्या घटना त्यासोबत इतर घटनांचा आढावा पोलीस पाटलांच्या माध्यमातून एकत्रित करता यावा, यासाठी पोलीस अंमलदारांच्या माध्यमातून मुख्यालयापर्यंत माहिती वेळेत पोहचावी, यासाठीच ही योजना सुरू केली आहे. – पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×