Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या वेतनवाढीचा आणि कंत्राट पद्धतीचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या वेतनवाढीचा आणि कंत्राट पद्धतीचा प्रश्न ऐरणीवर

आमदार रोहित पवारांनी व्यवस्थापकीय संचालकांची घेतली भेट

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) मधील जवानांच्या प्रलंबित मागण्यांसह वेतनवाढ, प्रशिक्षण आणि कंत्राटी पद्धत या संदर्भातील प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच या मागण्यांबाबतचे निवेदन ही त्यांनी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले असून, येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने घेण्याची त्यांनी विनंती केली आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट – सविस्तर बातमी

रोहित पवार यांनी सोशल मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या वेतनवाढीसह प्रशिक्षण आणि इतर अनेक मागण्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे जवानांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांनी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

निवेदनात कोणत्या मागण्या?

रोहित पवार यांनी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना दरमहा सुमारे २८ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. परंतु जवानांच्या खात्यामध्ये १९ ते २० हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या महागाईमुळे हे मानधन खूपच कमी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अनेक जवान अनेक वर्षे सेवा बजावत असतानाही त्यांची ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने वारंवार नियुक्ती केली जाते. त्यामुळे कायमस्वरूपी सेवेसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना केवळ ४५ दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अग्निशमन, प्रथमोपचार आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जवानांच्या प्रलंबित वेतनवाढीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्यभर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कार्यालयांपासून सार्वजनिक तसेच काही खासगी संस्थांमध्ये सुरक्षा पुरविण्याचे काम हे जवान करतात. महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या जवानांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य वेतन, प्रशिक्षण आणि सेवा सुरक्षितता मिळावी, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.

सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

निवेदनात दिलेल्या सर्व मागण्यांवर येत्या बोर्ड बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा बलातील हजारो जवानांच्या वेतनवाढी आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×