Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

१० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ (पुणे–पंढरपूर/पुणे–बारामती मार्ग) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

दुधाविरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण- बेलसर फाटाः- अ) १० जुलै रोजी रात्री २०ते १३जुलै रोजी सायं १७ वा. या वेळेत बारामती, फलटण, सातारा बाजुकडून येणारी पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक – उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी. (ब) १३ जुलै २०२६ रोजी सायं १७वा. ते १४ रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत जेजुरी, सातारा, फलटण, लोणंद, बारामती कडे जाणारी सर्व वाहतुक ही बेलसर-नाझरे कप-काळाओढा-मोरगाव-निरा-लोणंद-साताराकडे वळवावी.

मोरगाव चौक जेजुरी :- अ) १० जुलै रोजी रात्री २० वा. ते १२ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत निरा मार्गे पुणेकडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव -सुपा-कडेगाव चौफुला मार्ग पुणे बाजुकडे वळवायी. (ब)१४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटण कडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.

भोरवाडी फाटा जेजुरी :- १४ जुलै रोजी दुपारी १३ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री २२ वा. रोजी पर्यंत पुणे सासवड मार्गे लोणंद सातारा फलटण कडे जाणारी पालखीची वाहतुक व्यतिरिक्त इतर सर्व वाहने कोळविहीरे-मोरगाव रोड-मोरगाव-लोणी भापकर फाटा कोऱ्हाळे मार्गे फलटण बाजुकडे वळवावी.

श्री. छत्रपती शिवाजी चौक निरा: १० जुलै रोजी रात्री २० वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी – सासवड बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक निरा-मोरगाव-सुपा केडगाव चौफुलामार्गे पुणे बाजुकडे वळवावी.

बेलसर गाव कोथळे चौक : अ) १० जुलै 26 रोजी रात्री २० वा. ते १३जुलै रोजी सकाळी ०५ वा. या वेळेत कोथळे चौक येथून सासवड बाजूकडे कोणत्याही प्रकारे वाहतुक सोडू नये. (ब)१३जुलै रोजी सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक बेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा मोरगाव किंवा नाझरे- पांडेश्वर मार्ग सुपा मोरगाव अशी वळवावी.

पारगाव मेमाणे चौक जेजुरी ; १२ जुलै रोजी सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पूर्णपणे बंद करुन सदरची वाहतुक बेलसर कोथळे चौक कोथळे गाव- नाझरे काळा ओढा-मोरगाव किंवा नाझरे- पांडेश्वर मार्गे सुपा मोरगाव अशी वळवावी.

सुपा पोलीस स्टेशन, मोरगावः- सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव चौक पुणे ग्रामीण १३ जुलै सकाळी ५ वा. ते १५ जुलै रात्री २३वा. पर्यंत निरा बाजुकडे जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद करुन मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणेकडे वळवावी.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण १४ जुलै रोजी सकाळी ०५ ते १५ जुलै रात्री २३ वा. रोजी पर्यंत बारामती बाजुकडून निरा मार्गी लोणंद बाजुकडे जाणारी वाहतुक पूर्णपणे बंद करुन निंबुत-मुरुम-काळज मार्ग लोणंद अशी वळवावी.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणः जेजुरी नाका सासवड : १) १३ रोजी रोजीचे सकाळी ०५ वा. ते १५ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजीपर्यंत पुणे बाजुकडून जेजुरी मार्ग सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड-नारायणपुर- कापूरहोळ मागे सातारा, फलटण किंवा सासवड-वीर फाटा परिंचे वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळवावी. (२) १३ जुलै सकाळी ०५:०० वा ते १४ जुलै रोजी रात्री २३ वा. रोजी पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड – पारगाव मेमाणे- पिसर्वे-सुपा मार्गे बारामती अशी वळवावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×