Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पालखी सोहळ्यासाठी सासवड नगरपरिषद सज्ज-मुख्याधिकारी कैलास चव्हाण

पालखी सोहळ्यासाठी सासवड नगरपरिषद सज्ज-मुख्याधिकारी कैलास चव्हाण

११ जुलै रोजी सासवडमध्ये आगमन होणार असून १२ जुलै रोजी मुक्काम

marathinews24.com

सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जुलै रोजी आगमन होणार असून १२ जुलै रोजी मुक्काम आणि १३ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तसेच श्री संत सोपानकाका महाराज व श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालख्याही १२ जुलै रोजी सासवडमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पालखी सोहळ्याच्या स्वागताकरिता व वारकऱ्यांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता नगरपरिषद सज्ज आहे, अशी माहिती मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली आहे.

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

स्वच्छता व आरोग्य व्यवस्था

निर्मलवारी अभियानांतर्गत सुमारे १ हजार ८०० आसनी फायबर शौचालयांची उभारणी विविध ठिकाणी करण्यात आली आहे. पालखी तळ परिसराची संपूर्ण स्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पाणी व वीज व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील स्वच्छता, फॉगिंग, पालखी मार्गावरील स्वच्छता यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जंतूनाशक व तणनाशक साठा उपलब्ध करून फवारणी सुरू आहे. तात्पुरती स्नानगृहे उभारली जाणार असून दोन ठिकाणी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्लास्टिक बंदीसंदर्भात आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या असून स्टॉलधारकांना कचरा संकलनासाठी पिशव्या व कचरापेटी ठेवण्यात येणार आहेत. पालखी प्रस्थानानंतर शहरात पुन्हा जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. शाळा, हॉटेल, ढाबे यांची स्वच्छता व तपासणी करण्यात येत आहे. मच्छी व मटण विक्रेत्यांना तात्पुरते दुकान बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा व अग्निशमन व्यवस्था

पाणीपुरवठ्यांसाठी १२ विहिरींवर टँकर भरण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्था, पंपिंग यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली आहे. अखंड वीजपुरवठ्यासाठी महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे वाहन, टँकर व तात्काळ प्रतिसाद पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

विद्युत व्यवस्था

शहरातील सर्व स्ट्रीट लाईट कार्यान्वित राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग, पालखी तळ व सोपानदेव मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून विद्युत तारा व झाडांच्या फांद्यांची छाटणी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येत आहे.

बांधकाम व नगररचना

पालखी तळाचे सपाटीकरण, पाणी साचू नये यासाठी उपाययोजना, मुरूम भरणे व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, खड्डे बुजविणे व रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याचे काम सुरू आहे. अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही व एलईडी व्यवस्था

सुरक्षिततेसाठी पालखी तळावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून भाविकांसाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. नियंत्रण कक्षात दूरध्वनी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

स्वागत, निरोप व पूजा व्यवस्था

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत तसेच संत सोपानदेव व संत चांगावटेश्वर महाराज पालखीचा निरोप कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीतील पादुकांची महापूजा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे.

शाळा व हिरकणी कक्ष

दिंडी प्रमुखांच्या मागणीनुसार शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हिरकणी कक्ष स्थापन करून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्ष

पालखी तळाशेजारी व नगरपालिका कार्यालयासमोर असे दोन नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून ते २४ तास कार्यरत राहतील. प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे. पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व बॅरिकेटिंग व्यवस्था करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी १८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून विविध विभागांच्या माध्यमातून व्यापक तयारी करण्यात आली आहे. दिवेनाका येथे पालखीचे स्वागत तर जेजुरी नाका येथे निरोप देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×