Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण

पर्वती परिसरात तरुणाला वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाणधाकाने लुटले

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन त्याला सदनिकेत डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी तरुणाला त्याला मारहाण करुन विवस्त्रावस्थेतील चित्रफीत तयार केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी स्वप्नील कांबळे (रा. दत्तवाडी), सिद्धार्थ अनंता भगत (रा. नवी पेठ), सागर चौधरी (रा. कर्वेनगर) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीशी झालेल्या वादातून घर पेटवून दिले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २१ वर्षीय तरुण दत्तवाडी भागात राहायला आहे. आरोपींशी त्याचा वाद झाला होता. वादातून तरुणाचे ५ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपींनी दत्तवाडी परिसरातून अपहरण केले. त्याला दुचाकीवर बसवून कर्वेनगर भागात नेले. तेथील एका सदनिकेत त्याला डांबून ठेवण्यात आले. आरोपींनी त्याला मारहाण केली. फिर्यादी तरुणाला कपडे उतरविण्यास सांगितले. तरुणाची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत तयार केली. त्यानंतर जखमी अवस्थेतील तरुणाला रात्री साडेआठच्या सुमारास दत्तवाडी भागात सोडून आरोपी पसार झाले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×