खराडी बाह्यवळण मार्गावर घडली घटना
marathinews24.com
पुणे – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ४२ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४६ वर्षीय महिला खराडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी ९ जुलै रोजी खराडी बाह्यवळण मार्गावर रात्री आठच्या सुमारास मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पिशवीत ठेवलेली ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. सहायक पोलीस फौजदार कांबळे तपास करत आहेत.
























