Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

पालखी सोहळा स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध; हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमाचे आयोजन

marathinews24.com

बारामती – श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे बारामती नगर परिषद हद्दीत आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.

‘सूर्यदत्त’च्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य भारती – चरण सेवा’ उपक्रमाचे आयोजन – सविस्तर बातमी 

बारामती शहरात पालखीचा मुक्काम शारदा प्रांगण या ठिकाणी असून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नगर परिषद युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, वारकरी पुतळा सुशोभिकरण करणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात आली आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरु राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले शारदा प्रांगण येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ४५० अधिकारी व कर्मचारी असा संपूर्ण अधिकारी- कर्मचारी वर्ग वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करीत आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्वच्छता व जनजागृतीविषयक कामासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय येथील एकूण १ हजार २०० स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.

२६ ठिकाणी शौचालयाची सुविधा

बारामती नगर परिषद व बारामतीमधील ‘बारामती सजग नागरिक मंच’ यांनी संयुक्तपणे शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात मार्केट यार्ड- इंदापूर रोड(२), मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रोड, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रोड, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती (जळोची) अशा एकूण २६ विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांकरिता ५ ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा

सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरीता जलशुद्धीकरण केंद्र(२), कॅनाल पुलावर पाटस रिंग रोड, अवचट इस्टेट, कचरा डेपो रस्ता, हॉटेल चैतन्य ५ ठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शारदा प्रांगण येथे वारकरी स्त्री पुरुष यांना वेगवेगळी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.नगर परिषदेमार्फत शारदा प्रांगण येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात आला आहे. हेल्पलाईन क्र.१८००२३३२३०२ कार्यान्वित आहे.

हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमाचे आयोजन

‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमा करिता नगर परिषद कार्यरत असून पालखी कालावधीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर कचरा पडू नये यासाठी पेट्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच कॅनालवर अग्नीशमन विभागामार्फत पहारा ठेवण्यात येणार असून कॅनाल मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरा ध्यक्ष श्री सचिन सातव,मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे, आरोग्य सभापती श्री.नवनाथ बल्लाळ, उपनगराध्यक्षा सौ. श्वेता नाळे व सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×